महाराष्ट्रात एक धक्कादायक प्रकरण मुंबईत समोर आलेले असून विरार येथे एका वीस वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलेला आहे. काही दिवसांपूर्वी हे प्रकरण समोर आले होते मात्र तपासादरम्यान आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली असून पीडित तरुणी ही तिच्या प्रियकरासोबत विरार येथील एका मंदिराच्या पाठीमागे असलेल्या टेकडीवर फिरण्यासाठी गेलेली होती त्यावेळी दोन आरोपींनी त्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांना चक्क नग्न अवस्थेत डान्स करण्यास भाग पाडलेले होते असा दावा तरुणीच्या प्रियकराने केलेला असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, धीरज सोनी आणि यश शिंदे अशी दोन्ही आरोपींची नावे असून गुरुवारी सकाळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. दोन्ही आरोपी घटना घडली त्या दिवशी मंदिराच्या पाठीमागे असलेल्या टेकडीवर दारू पिण्यासाठी गेलेले होते त्यावेळी तिथे ही तरुणी आणि तिचा प्रियकर देखील बसलेले त्यांना आढळून आले. दोघांनी सदर तरुणी आणि तिचा प्रियकर यांच्यातील काही खाजगी क्षण मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट हिसकावून घेत तेथून पसार झाले. चोरीचा माल असल्याकारणाने आरोपींना ते लॉकेट विकण्यात यश आले नाही.
आरोपी पुन्हा घटनास्थळी आले त्यावेळी देखील तरुणी आणि तिचा प्रियकर तिथेच असल्याकारणाने त्यांनी त्या दोघांकडून पाच हजार आणि दोन हजार रुपये मागितले तसेच त्यांचे फोन देखील हिसकावून घेतले. आपल्याकडे पैसे नाहीत असे सांगितल्यानंतर त्यांनी फोन पेमधून पाचशे रुपये ट्रान्सफर करायला सांगितले आरोपी यांनी त्यांना तुमचे व्हिडिओ डिलीट करू पण आधी आम्हाला अंगावरील सगळे कपडे उतरवून डान्स करून दाखवा अशी देखील मागणी केली असे तरुणाचे म्हणणे आहे.
प्रेमीयुगुलाने त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिथे प्रकार केल्यानंतर देखील आरोपींचे समाधान झाले नाही आणि त्यांनी तिथे असलेली बाटली प्रियकराच्या डोक्यात मारली आणि कंबरेच्या बेल्टने त्याला तिथे बांधून ठेवले आणि तरुणीला तिथून ओढत त्यांनी तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर तरुणाचे कपडे पेटून दिले आणि त्यानंतर तरुणीची पर्स घेऊन आरोपी फरार झालेले होते.
आपल्या सोबत घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर पीडित तरुणी घाबरून गेली आणि घरी पोहोचली त्यानंतर तिने पोलिसात दाखल होत एका तरुणाला नग्न अवस्थेत तिथे बांधून ठेवलेले आहे असा फोन केला. पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी त्याची सुटका केली. सुरुवातीला तरुणीने आपल्यावर अत्याचार झाला नाही असे सांगितले होते मात्र पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर तिने झालेला प्रकार कथन केला आणि दोनही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सुरुवातीलाच लॉकेट हिसकावून नेल्यानंतर देखील सदर तरुणी आणि तिचा प्रियकर पुन्हा तिथे कशासाठी थांबलेले होते याचा देखील पोलिस आता तपास करत आहेत.