देशात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून लग्नाला वीस वर्षे झाल्यानंतर पत्नीने पतीचे घर सोडून दुसरे लग्न केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. सदर महिलेने तिच्या दुसऱ्या लग्नाचा फोटो पतीच्या मोबाईलवर पाठवत मी आता दुसरे लग्न केलेले आहे असे म्हटलेले आहे. हिमाचल प्रदेशातील हे प्रकरण असून महिलेचा शोध घेण्यासाठी पतीने पोलिसात धाव घेतलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, गरजेट येथील रहिवासी असलेला घनारी नावाचा व्यक्ती पोलीस ठाण्यात पोहोचला आणि त्याने पत्नीने काही कामासाठी आपण पुन्हा येथे जात आहोत असे सांगितले होते त्यानंतर ती आपल्या माहेरी जाणार होती मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी तिने मला फोन करून ‘ मी आता घरी कधीच येणार नाही मी दुसरे लग्न केलेले आहे ‘ असे म्हटलेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेला दोन मुले असून मुलगा नववीला आहे तर मुलगी इयत्ता बारावीमध्ये शिकते बारावीचे पेपर सुरू असल्याकारणाने मुलीला देखील मोठा धक्का बसलेला असून सदर व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे महिलेला ताब्यात घेतल्यानंतर काय तो प्रकार समोर येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे.
तक्रारदार व्यक्ती आणि महिला यांचा वीस वर्षांपूर्वी विवाह झालेला होता. लग्नानंतर सर्व काही सुरळीत चालू होतं आणि पत्नी घर सोडून गेली तेव्हा देखील कुठलेही भांडण किंवा नात्यात कुठलाही दुरावा निर्माण झालेला नव्हता तसेच आमच्यात कुठले वाद देखील नाहीत असेही पतीचे म्हणणे आहे. दुसऱ्या दिवशी फोन करून पत्नीने मी दुसरे लग्न केलेले आहे आता परत येणार नाही असे म्हणत तिच्या प्रियकरासोबत सोबत गळ्यात एकमेकांच्या गळ्यात माळा घातलेले फोटो पतिच्या व्हाट्सअपवर पाठवून दिलेले आहेत त्यानंतर पतीला झाल्या प्रकाराचा अंदाज आला आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली.