महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून कल्याण नजीक असलेल्या टिटवाळा परिसरातील डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाचा छडा लावण्यास पोलिसांना यश आले असून त्यानंतर जे सत्य समोर आले त्यावर पोलिसांना देखील सुरुवातीला विश्वास बसला नाही. आपल्या अनैतिक संबंधांना मान्यता द्यावी म्हणून पत्नी आणि तिची आई ह्या डॉक्टरवर मानसिक दबाव आणत होत्या आणि याच मानसिक त्रासाला कंटाळून डॉक्टरने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , टिटवाळा पूर्वेला नारायण रोड परिसरात मोहन हाईट्स या इमारतीत डॉ. अविनाश देशमुख हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. अविनाश हे इंदिरानगर परिसरात आपली डॉक्टरकीची प्रॅक्टिस करत होते तर त्यांची पत्नी असलेल्या डॉ. शुभांगी देशमुख हिचे आपल्या मामे भावासोबत अनैतिक संबंध होते.
आपल्या अनैतिक संबंधांना पतीने विरोध करू नये म्हणून डॉक्टर पत्नी आणि तिची आई डॉ. अविनाश यांच्यावर दबाव टाकत होत्या तसेच सदर प्रकारात सासू -सासऱ्याची देखील अडचण नको म्हणून त्यांच्यापासून वेगळे राहण्यासाठी ही पत्नी आणि तिची आई डॉक्टरवर दवाब आणत होत्या .
सतत पत्नी आणि तिच्या आईपासून होत असलेल्या या मानसिक त्रासाला वैतागून अविनाश देशमुख ( वय 32) यांनी 12 नोव्हेंबर रोजी राहत्या घरी आत्महत्या केली . टिटवाळा पोलिसानी आत्महत्येची नोंद करीत पुढील तपास सुरु केला मात्र तपास सुरु असताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
डॉ. अविनाश यांनी आत्महत्या करण्यापूर्वी साताऱ्याला गेलेली असलेल्या आपल्या पत्नीला याबाबत माहिती दिली आणि पत्नीने तिच्या आईला याबाबत सांगितले. पत्नीच्या आईने त्याच परिसरातच राहत असलेल्या त्यांच्या कुटुंबियांना कळविले खरे मात्र त्यांचे कुटुंबिय डॉक्टरांच्या घरी पोहचण्याआधीच अविनाश यांनी आत्महत्या केलेली होती.
टिटवाळा पोलिसांनी डॉक्टरच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या पत्नी आणि सासू यांच्या विरोधात पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघींनी मानसिक त्रास दिल्यानेच डॉ. अविनाश देशमुख यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. डॉ. शुभांगी देशमुख आणि संगीता मोरे अशी आरोपींची नावे असून या दोघींविरुद्ध कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.