‘ दो शादी करेंगे ‘ , दोघांशीही लग्नासाठी नववधूचा ठाण्यात गोंधळ : पहा व्हिडीओ

Spread the love

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून त्यामध्ये एक नवविवाहित असलेली नववधू चक्क दोन व्यक्तींसोबत लग्न करण्यासाठी पोलीस ठाण्यातच गोंधळ घालत आहे. नवी दिल्ली परिसरातील हे प्रकरण असून एका नवविवाहित असलेल्या वधूने प्रियकराशी लग्न करण्याची मागणी करत पोलीस ठाण्यात जोरदार गोंधळ घातला.

सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून व्हिडिओ क्लिपमध्ये वधू ‘ दो शादी करेंगे दो शादी ‘ असे म्हणत महिला पोलीस अधिकारी यांच्यासोबत गैरवर्तन करताना दिसून येत आहे. सदर नववधू ही कागदपत्रे आणि मोबाईल फेकताना दिसत असून व्हिडिओ संपण्यापूर्वी अखेर एक महिला कॉन्स्टेबल तिला एका खोलीत घेऊन जाते. सदर तरुणीचे प्रियकरासोबत लग्न झाले नाही म्हणून तिने हा ड्रामा केला असल्याचे दिसून येत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये नववधू दारूच्या नशेत असल्याचे दिसून येत असून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘ एकासोबत लग्न केल्यानंतर लगेचच ही महिला तिच्या प्रियकरासोबत लग्नाची मागणी करते आणि म्हणते ‘ दो शादी करेंगे दो शादी ‘ आणि पोलीस मूक प्रेक्षक बनून सगळं पाहत आहेत. महिलेच्या पतीबद्दल खूप वाईट वाटत आहे असे देखील या व्हिडिओत म्हणण्यात आलेले आहे. सदर व्हिडिओला अनेक जणांच्या आगळ्या वेगळ्या प्रतिक्रिया देखील येत आहेत.


Spread the love