महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण छत्रपती संभाजीनगर येथे समोर आलेले असून जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील एका प्रेमीयुगुलाने आपले लग्न होणे शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर एकत्र मृत्यूला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आणि रेल्वेखाली स्वतःला झोकून दिले मात्र त्यात तरुणाचा मृत्यू झालेला असून तरुणी देखील गंभीररित्या जखमी झालेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, उमेश मोहन तारू ( वय 23 ) असे या प्रकरणात मयत झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचे मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड येथील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. सदर तरुणी ही देखील त्याच्या नात्यातीलच होती मात्र यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करत असल्याने तो पुणे येथे होता मात्र दरम्यानच्या काळात तरुणीच्या घरच्यांनी तिचे इतरत्र लग्न लावून दिलेले होते मात्र तरी देखील ते दोघे संपर्कात राहत होते.
उमेश याने ठाणे येथे पोहोचत या तरुणीला सोबत घेतले आणि दोघे पुण्याला गेले. तेथून ते छत्रपती संभाजीनगर मार्गे घरी जाण्यासाठी निघालेले होते मात्र विवाह होणार नाही हे लक्षात आल्यानंतर उमेश आणि त्याच्या प्रेयसीने रेल्वेसमोर उडी घेतली त्यामध्ये उमेश याचा मृत्यू झाला तर त्याची प्रेयसी ही गंभीर जखमी झालेली आहे. सदर प्रकार करण्याआधी त्याने त्याच्या मित्रांना मोबाईलवरून माहिती दिली होती मात्र काही उपाययोजना करण्याच्या आतच हा प्रकार घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .