‘ तू मला आवडते बोल की..’ , पुण्यात मुलाला सोडायला आली होती महिला

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला मुलांना सोडण्यासाठी शाळेत गेलेल्या एका महिलेला आडवत ‘ तू मला खूप आवडतेस तू माझ्याशी का बोलत नाहीस ‘ असे म्हणत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. पीडित महिलेने त्याला मला त्रास देऊ नको असे सांगितल्यानंतर आरोपीने तिला शिवीगाळ केली. चिखली परिसरातील मोरे वस्ती इथे 31 तारखेला सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडलेली आहे.

सदर प्रकरणी पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली असून पोलिसांनी तीस वर्षीय आरोपीला अटक केलेली आहे. आरोपी व्यक्तीने अनेकदा फिर्यादी महिला यांचा पाठलाग केला तसेच त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशा स्वरूपाचे वर्तन केले. महिलेने विरोध दर्शवल्यानंतर आरोपीने त्यांना शिवीगाळ केली असे देखील त्यांनी फिर्यादीत म्हटलेले आहे.


Spread the love