गेल्या काही वर्षांपासून पुण्यात भाईगिरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार पिंपरी परिसरात उघडकीला आलेला आहे. रात्री हॉटेल बंद करत असताना हॉटेल उघडून आम्हाला जेवण बनवून द्या असे सांगितले मात्र मालकाने नकार दिल्यानंतर हॉटेल चालकाला आणि इतर दोन जणांना मारहाण करण्यात आलेली आहे सोबतच आम्हाला जेवण दिले नाही तर मारून टाकू अशी देखील त्यांनी धमकी दिली. चिखली येथील माऊली हॉटेल येथे चार तारखेला रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ज्ञानेश्वर हिरवे ( वय 26 राहणार चिखली ) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली असून फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, दिनेश खरात (वय २२ ) दोन साथीदारांना घेऊन हॉटेलमध्ये हॉटेल बंद करण्याच्या वेळेस आलेला होता . फिर्यादी यांचे म्हेत्रे गार्डन रोडवर हॉटेल असून मंगळवारी रात्री ११:०० च्या सुमारास दिनेश आणि त्याचे दोन साथीदार आले आणि त्यांनी जेवण मागितले. हॉटेल बंद करत आहे असे सांगितल्यानंतर त्यांनी दमदाटी करत आपल्याला मारहाण केली असे त्यांचे म्हणणे आहे. हॉटेल बंद असल्याकारणाने आपण त्यांना जेवण दिले नाही मात्र त्यांनी जिवे मारण्याची देखील आपल्याला धमकी दिली आहे असे देखील फिर्यादी यांचे म्हणणे आहे.