गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार पिंपरीत समोर आलेला आहे. एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवत आरोपीने प्रेमाच्या जाळ्यात ओढले त्यानंतर अनेकदा तिच्यावर शारीरिक लैंगिक अत्याचार देखील केले आणि तिच्याकडून सुमारे तीन लाख रुपये देखील घेतले. आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यावर पीडित महिलेने सोमवारी भोसरी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, राकेश रवींद्रनाथ नायर ( वय 22 राहणार भोसरी ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून पीडित महिलेने म्हटल्याप्रमाणे सदर प्रकार हा जुलै 2019 पासून तर 12 सप्टेंबर 2022 पर्यंत सुरू होता. आरोपी राकेश याने या महिलेला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यावर वेळोवेळी ठिकठिकाणी घेऊन जात अत्याचार केले. आरोपीने तिच्याकडून तीन लाख रुपये देखील घेतले असे देखील तिचे म्हणणे असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत .