विवाहित महिलेचं दीरासोबत ‘ वाकडं पाऊल ‘, कल्पनाही करू शकणार नाही असा शेवट

Spread the love

देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण सध्या बिहार इथे समोर आलेले असून बांका येथे दोन मुलींची आई असलेली एक महिला तिच्या दिराच्या प्रेमात पडली आणि त्यानंतर त्यांच्या प्रेम कहानीचा अखेर दुर्दैवी शेवट झालेला आहे. सदर महिला आणि तिच्या प्रेमात पडलेला दिर यांनी एकाच झाडावर गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केलेला आहे.

बिहार राज्यातील बांका येथे सुईया पोलीस स्टेशन परिसरात ही घटना उघडकीला आलेली असून मयत महिलेचे नाव सविता देवी असे असल्याचे समजते. रघुनाथ दास नावाचा तिच्या नात्यातील एक दीर होता. त्याचे देखील लग्न जमलेले होते मात्र दरम्यानच्या काळात तो आणि सविता देवी यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले. त्याचा साक्षगंध कार्यक्रम देखील ठरलेला होता मात्र गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू असल्याने तिने त्याच्या लग्नाला विरोध केला होता . साक्षगंध होण्यापूर्वीच त्यांनी पहाटे घरातून पलायन केले आणि त्यानंतर एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

शौचासाठी म्हणून सकाळी काहीजण बाहेर पडले त्यावेळी कुणाची तरी नजर झाडावर लटकलेल्या मृतदेहांवर पडली आणि त्यानंतर पोलिसांना या प्रकरणी खबर देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तात्काळ त्यांना दोघांनाही झाडावरून खाली उतरवले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता . मयत रघुदास याच्या खिशातून कुंकवाचे बंडल जप्त करण्यात आलेले असून त्यांना पळून जाऊन लग्न करायचे होते मात्र ते शक्य झाले नाही म्हणून त्यांनी हा प्रकार केल्याची चर्चा आहे.


Spread the love