पुण्यात सापळा रचला अन सरकारी डॉक्टर जाळ्यात

Spread the love

दिव्यांग व्यक्तींना अनेकदा शासकीय कामकाजासाठी तसेच सरकारच्या काही सवलतींचा फायदा घेण्यासाठी डिसेबिलिटी सर्टिफिकेटची गरज असते. शासकीय रुग्णालयात हे सर्टिफिकेट उपलब्ध करून देण्यात येते मात्र डॉक्टरकीच्या पेशाला काळीमा फासण्याचा प्रकार पुण्यात समोर आलेला असून या प्रकरणात डॉक्टरांनी पीडित व्यक्तीकडे लाचेची मागणी केलेली होती.

उपलब्ध माहितीनुसार, डॉक्टर पवन भिला शिरसाट ( वय 43 बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे ) असे याप्रकरणी आरोपीचे नाव असून तक्रारदार व्यक्ती देखील सरकारी विभागात काम करतात. त्यांना डिसॅबिलिटी सर्टिफिकेटची आवश्यकता असताना त्यांनी ससून हॉस्पिटल येथे अर्ज केलेला होता त्यावेळी ससून रुग्णालयातील लोकसेवक असलेले डॉक्टर पवन शिरसाठ यांनी त्यासाठी साठ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

आरोपी डॉक्टर पवन शिरसाठ यांनी यावेळी तक्रारदार यांना सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी वरिष्ठांना पैसे द्यावे लागतात त्यामुळे तुम्ही साठ हजार रुपये द्या त्यानंतर तुम्हाला डिसेबिलिटी सर्टिफिकेट देऊन टाकतो असे म्हटलेले होते. तक्रारदार व्यक्ती यांनी त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ नंबरवर संपर्क केला त्यावेळी त्यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे लक्षात आल्यानंतर सापळा रचण्यात आला होता .

साठ हजार रुपये रकमेची मागणी करणे आणि ती स्वीकारणे हे समोर हे असे घडल्यानंतर पथकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेली असून बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे येथील पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर याप्रकरणी पुढील तपास करत आहे. सरकार दरबारी लाचेची मागणी होत असेल तर नागरिकांनी न भिता टोल फ्री नंबर असलेल्या 1064 नंबरवर संपर्क करावा तक्रारदार व्यक्ती यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे एसीबीकडून सांगण्यात आलेले आहे.


Spread the love