बारा तारखेला पहाटे पाचला अन तेरा तारखेला दुपारी दोनला , मुलीची मावशी म्हणतेय की..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना पुण्यात समोर आलेली असून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. 12 तारखेला यमुनानगर येथे पहाटे पाच वाजता आणि 13 तारखेला दुपारी दोन वाजता तळवडे येथील हा प्रकार घडल्याचे अल्पवयीन मुलीचे म्हणणे आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित मुलीच्या मावशीने या प्रकरणी चिखली पोलिसात फिर्याद दिलेली असून त्यानंतर अजित पाटील ( वय 25 राहणार सांगली ) या आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फिर्यादी यांच्या बहिणीची मुलगी अल्पवयीन आहे याची आरोपीला कल्पना होती मात्र तरीदेखील त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवत पळवून लॉजवर घेऊन गेला.

आरोपीने तिच्यावर 12 तारखेला यमुनानगर येथे पहाटे पाच वाजता आणि 13 तारखेला दुपारी दोन वाजता तळवडे येथील एका लॉजवर अत्याचार केला. पीडित मुलीने त्याला विरोध केला असता आरोपीने तिला जिवे मारण्याची धमकी दिली असे देखील फिर्यादीत नमूद केलेले असून आरोपीच्या विरोधात पोक्सो आणि बलात्कार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


Spread the love