महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आली असून चक्क आईसमान असलेल्या सासूवर एका जावयाने बलात्कार केला आहे. 27 वर्षांच्या जावयावर आपल्या 45 वर्षांच्या सासूवर बलात्कार केल्याचा आरोप लावण्यात आला असून प्रकरण पोलिसात जाताच आरोपी फरार झालेला आहे.आरोपीविरुद्ध हिललाइन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार ,ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर इथे ही घटना उघडकीस आली असून पीडिता सासू हिललाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते तर आरोपी जावईही उल्हासनगर येथे राहतो. आरोपी जावई लग्नापूर्वी पत्नीच्या आईवर म्हणजेच सासूवर एकतर्फी प्रेम करत होता मात्र समाजात रहायचे असल्याने तो सासूशी लग्न करू शकला नाही त्यामुळे आरोपीने पीडितेच्या मुलीकडे लग्नाची मागणी केली आणि त्यानंतर त्याने २०१८ ला लग्न केले.
पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार , सदर घटना ही प्रेमप्रकरणाची असून पीडितेच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 376,506 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून त्याला अटक केल्यावर या प्रकरणात अनेक खुलासे होण्याची शक्यता असल्याचे देखील पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.