मॅडम तुमच्या नावाचे पार्सल आहे तैवानला पाठवू का ? , पुण्यातील तरुणीला फोन अन..

Spread the love

पुण्यामध्ये एक अत्यंत खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून आम्ही अंधेरी पोलीस ठाण्यातून बोलत आहोत. तुमच्या नावाने एक पार्सल आलेले असून ते आता मुंबईवरून तैवान इथे पाठवले जाणार आहे त्यामध्ये 140 ग्रॅम एमडी नावाचा अमली पदार्थ आढळून आलेला आहे म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यामध्ये तुमचे नाव आहे असे म्हणत एका सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या तरुणीला सायबर भामट्यांनी तब्बल 25 लाख 61 हजार रुपयांना चुना लावलेला आहे.

सदर प्रकरणी कोथरूड येथील एका तरुणीने फिर्याद सायबर पोलिसात फिर्याद दिलेली असून तरुणीचे वय 29 वर्ष असल्याचे समजते. 11 एप्रिल रोजी ही घटना घडलेली असून अपर्णा कृष्णा अय्यर , अजय कुमार बंसल , भानसिंग राजपूत अशी आरोपींची नावे आहेत . पोलीस असल्याची बतावणी करणारा आणि बँकेचे खातेधारक यांच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

फिर्यादी या पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनियर असून अंधेरी पोलीस ठाण्यातून आपण पोलीस अधिकारी बोलत असल्याची बतावणी करण्यात आलेली होती त्यामध्ये समोरील व्यक्तीने तुमच्या नावाचे एक पार्सल असून ते मुंबईवरून तैवान इथे पाठवले जाणार आहे . त्यावर तुमचे नाव आहे मात्र त्यात काही अमली पदार्थ आढळून आलेले आहे त्यावर तुमचे नाव आहे म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे अशी तरुणीला भीती दाखवली होती.

पीडित तरुणीने त्यानंतर आपण असे कुठलेच पार्सल पाठवलेले नाही असे समोरच्या व्यक्तीला सांगितले त्यावर त्याने तिच्या आधार कार्डचे शेवटचे चार क्रमांक देखील तिला सांगितले त्यानंतर मात्र ती घाबरून गेली. आपल्या नावाचा कुणीतरी गैरवापर केला आहे त्याचा फायदा घेत त्यांचा ऑनलाईन जबाब घेण्याच्या बहाण्याने बँकेच्या खात्याची देखील माहिती आरोपींनी घेतली आणि तुमच्या खात्यावर कोणीतरी ऑनलाईन पैसे पाठवत आहे असे सांगत त्यांना एक ट्रांजेक्शन करण्यास भाग पाडले आणि वेगवेगळ्या पद्धतीने दमदाटी करत त्यांच्याकडून 25 लाख 61 हजार रुपये दुसऱ्या एका खात्यात वर्ग करून घेतले. सायबर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.


Spread the love