‘ मॅडम तुमचं टास्क अपूर्ण आहे ‘ , पुण्यात खळबळजनक घटना समोर

Spread the love

कोरोना काळानंतर ऑनलाईन कामाची पद्धत मोठ्या प्रमाणात बदललेली असून अनेकजण घरून काम करण्यास प्राधान्य देतात त्यामुळे ऑनलाइन कामाच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींची देखील संख्या सातत्याने वाढत असून यामध्ये अनेक फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत अशीच एक घटना पुण्यात पिंपरी येथे समोर आलेली असून एका तरुणीला या प्रकरणात तब्बल 39 लाखांचा फटका बसलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही आयटी क्षेत्रात काम करणारी असून ऑनलाईन कामाच्या ती शोधात होती. सायबर भामट्यांनी तिला आपल्या जाळ्यात ओढले आणि ऑनलाईन कामाचे एक टास्क दिले त्यानंतर तिच्या खात्यात चारशे रुपये जमा झाले . सातत्याने काम करत राहिल्याने पैसे जमा होत असल्याने या तरुणीला विश्वास आला आणि त्यानंतर पुढील टास्क देण्यासाठी तुम्हाला पैसे जमा करावे लागतील असे सांगण्यात आले . तरुणीने काही पैसे जमा केले मात्र तरी देखील आरोपींनी तुमचे टास्क अद्यापही अपूर्ण आहे तुम्हाला आणखीन रक्कम भरावी लागेल मात्र त्यावर तुम्हाला अधिक परतावा मिळेल असे आमिष दाखवले.

आपले टास्क पूर्ण करण्याच्या उद्देशाने सदर तरुणीने मित्र-मैत्रिणींकडून तब्बल 39 लाख रुपये उसने घेतले आणि वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर केले. सहा एप्रिल ते १४ एप्रिल अशा अवघ्या आठ दिवसात या तरुणीची तब्बल 39 लाखांना फसवणूक करण्यात आली. खाते रिकामे झाल्यानंतर या तरुणीने मंगळवारी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिलेली असून पोलिसांनी मोबाईलधारक, टेलिग्राम लिंक पाठवणाऱ्या सहा बँकेच्या खातेदारांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल केलेला आहे अशाच पद्धतीने सध्या फसवणुकीचे अनेक प्रकार सुरू असून कमी कष्टात जास्त पैसे या प्रकारातून नागरिक अशा यांच्या टोळक्यांच्या जाळ्यात सापडत आहेत.


Spread the love