‘ तू तिच्या नादी लागलाय का ? ‘ , बारामतीत तरुणाला चौकात बोलावून घेतलं अन..

Spread the love

पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार बारामती इथे समोर आलेला आहे. बारामती शहरातील देशमुख चौकात मुलीवरून मारामारीचे प्रकरण घडलेले असून शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, गौरव राकेश वर्मा आणि गणेश दाते उर्फ गरगडे ( राहणार बारामती ) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे असून अभिषेक उर्फ आबा प्रकाश वनवे असे घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चैतन्य संदीप चांदगुडे ( राहणार श्रीराम नगर कसबा बारामती ) यांनी यासंदर्भात पोलिसात फिर्याद दिलेली आहे

अभिषेक वनवे आणि चैतन्य चांदगुडे हे लहानपणापासून मित्र असून घटना घडली त्या दिवशी अभिषेक वनवे याने चांदगुडे याला फोन केलेला होता त्यात गणेश नावाच्या एका मुलाचा मला फोन आलेला होता त्याने मला तू अमुक एका मुलीच्या नादी लागलेला आहेस का ? तिचे आणि माझे अफेअर आहे तू तिच्या नादी लागू नकोस असे सांगितले. काही वेळानंतर गणेश याने अभिषेक वनवे याला देशमुख चौकात बोलावले तिथे आपण बोलून भांडण मिटवू असे देखील तो म्हणाला त्यानंतर चैतन्य चांदगुडे हा त्याचा मित्र टायगर महेंद्र गायकवाड याला घेऊन देशमुख चौकात आलेले होते.

गणेश हा बुलेटवर बसलेला होता व त्याच्या बाजूला गौरव वर्मा हा उभा होता. चांदगुडे यांनी खाली उतरत गणेशाला काय मॅटर आहे असे विचारले त्यावर वनवे हा सारखा आमच्या गल्लीत का येतो यावरून त्यांच्या भांडण सुरू झाले त्यावेळी गौरव वर्मा याने शर्टमागे लपवलेला चाकू काढला आणि अभिषेक वनवे यांच्या कमरेवर मारला. त्या ठिकाणाहून रक्त येऊ लागल्यानंतर तो पळून जाऊ लागला त्यावेळी गौरव वर्मा आणि गणेश दाते या दोघांनी त्याला गाठले आणि मारायला सुरुवात केली. वनवे यांच्या शरीरातून रक्तस्राव होऊ लागल्यानंतर दोन्ही आरोपी बुलेटवर बसून कदम चौकाच्या दिशेने निघून गेले. सदर घटनेत अभिषेक वनवे हा गंभीर जखमी झालेला असून पुण्यातील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे .


Spread the love