पार्टी विथ डिफरन्स असा नारा घेऊन नागरिकांमध्ये जाऊन मते मागणाऱ्या भाजपला निवडणूक समोर आल्यानंतर याचा विसर पडतो की काय अशी परिस्थिती सध्या पुण्यात असून कुख्यात गुंड म्हणून ओळख असलेला शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी चक्क पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये असाच प्रकार घडलेला होता त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला मात्र आता त्याच हाताने त्यांनी स्वाती मोहोळ यांना भाजपचे कमळ सोपवलेले आहे.
स्वाती मोहोळ या शरद मोहोळ यांच्या पत्नी असून शरद मोहोळ याच्या विरोधात पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण परिसरात अनेक गुन्हे दाखल आहेत. कातिल सिद्दीकी प्रकरणात शरद मोहोळ आरोपी असून येरवडा येथील कारागृहात सिद्धीकी याचा गळा आवळून खून करण्यात आलेला होता. त्याच्याच पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर मात्र चंद्रकांत पाटील यांची भाषा बदललेली पाहायला मिळत आहे .
चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘ नव्याने पक्षात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींच्या मनात एक भीती असते की आपल्याला पक्षात स्थान मिळेल का? उचित सन्मान मिळेल का ? . फक्त प्रवेश मिळेपर्यंतच मागे लागतील आणि नंतर कोपऱ्यात फेकून देतील मात्र भारतीय जनता पार्टी हा प्रत्येकाचा सन्मान करणारा पक्ष आहे. स्वाती मोहोळ यांचे कर्तृत्व पाहून पक्ष त्यांना चांगली जबाबदारी देईल , असे देखील त्यांनी पुढे म्हटले आहे .