‘ नजर हटी दुर्घटना घटी ‘, ससूनमध्ये त्याला आणलेलं होत अन अचानक..

Spread the love

पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार ससून रुग्णालयात समोर आलेला असून एका आरोपीला उपचारासाठी ससून रुग्णालयात आणले असताना त्याने बंदोबस्तावरील पोलिसांना चकमा देत तेथून पलायन केलेले आहे. सदर आरोपी हा आर्म अॅक्ट नुसार पोलिसांच्या ताब्यात होता मात्र त्याने हातातील बेडी काढून धूम ठोकलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, बाळू उर्फ चक्रधर रानबा गोडसे ( वय 31 राहणार टाकळी लोणार तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर ) असे आरोपीचे नाव असून ससून रुग्णालयातील वार्ड नंबर 26 मध्ये शनिवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्याला आणण्यात आलेले होते. पोलीस शिपाई प्रकाश मांडगे यांनी बंडगार्डन पोलिसात त्याच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे.

हत्यार बाळगण्याच्या आरोपाखाली बाळू गोडसे याला श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याच्यावरील उपचारासाठी त्याला 19 एप्रिल रोजी ससून रुग्णालयात आणण्यात आले. त्याच्या बंदोबस्तासाठी पोलिसांची नेमणूक देखील करण्यात आलेली होती त्यावेळी फिर्यादी आणि पोलीस शिपाई संजय कोतकर हे तिथे उपस्थित होते आरोपीला डिस्चार्ज कधी देणार यासाठी ते चौकशीला गेले त्यावेळी गोडसे याने त्याच्या बेडीमधून हात काढला आणि गर्दीचा फायदा घेत तिथून पळून गेला सदर प्रकरणी त्यानंतर पोलीस त्याचा सध्या शोध घेत आहेत.


Spread the love