सोशल मीडियावर सध्या एका आईची जोरदार चर्चा सुरू असून विशेष म्हणजे या आईने मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून नातेवाईकांच्या मदतीने चक्क स्वतःच्या मुलीचे अपहरण केलेले आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील राजुर येथे गुरुवारी दुपारी चार वाजता ही घटना घडलेली असून राजुर पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, राजुर येथील रहिवासी असलेले सिद्धेश्वर नारायण साबळे यांचा दीड महिन्यांपूर्वी गावातील एका मुलीसोबत प्रेमविवाह झालेला आहे. मुलीच्या आईला हे लग्न पसंत नाही त्यामुळे सिद्धेश्वर हे आपल्या पत्नीसोबत राजुरी इथे राहतात . मुलीने मनाविरुद्ध लग्न केले म्हणून गुरुवारी दुपारी मुलीची आई नातेवाईकांसह घरात घुसली आणि तिने फिर्यादीच्या आईला आणि बायकोला शिवीगाळ केली त्यानंतर फिर्यादी यांच्या बायकोला जबरदस्तीने पांढरा रंगाच्या गाडीत बसून ते निघून गेले.
सिद्धेश्वर साबळे यांनी याप्रकरणी राजुर पोलीस ठाणे गाठत या प्रकरणातील मुख्य संशयित असलेला भगवान शिंदे याच्यासोबत मुलीची आई आणि तीन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार करत असल्याची माहिती आहे.