देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण सध्या नोएडा इथे समोर आलेले असून एका प्रियकराने विवाहित असलेल्या त्याच्या प्रेयसीवर कटरने वार करून तिची हत्या केलेली आहे. नोएडा येथील सेक्टर 63 भागात एका कॉलनीमध्ये ओयो हॉटेलच्या लॉजमध्ये या महिलेचा मृतदेह आढळून आलेला आहे. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास महिलेची हत्या करून आरोपी फरार झालेला होता. हॉटेल कर्मचाऱ्यांना शंका आल्यानंतर त्यांनी दरवाजा तोडला त्यावेळी हा प्रकार समोर आलेला आहे.
हॉटेल कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला त्यावेळी बाथरूममध्ये महिलेचा मृतदेह आढळून आलेला होता. महिलेचा प्रियकर असलेला आणि तिच्यासोबत आलेल्या सोनू नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून तो उत्तर प्रदेशातील इटावा येथील रहिवासी आहे. मयत महिला आणि आरोपी दोघेही टेलरिंगचे काम करत होते. सोनू याचे लग्न जमलेले होते मात्र महिला त्याला लग्नासाठी विरोध करत होती त्यामुळे त्याने अखेर तिची हत्या केली.
उत्तर प्रदेशातील इटावा येथील मूळ रहिवासी असलेला राजेंद्र बाबू हा त्याची पत्नी अनिता आणि दोन मुलांसह राहत होता. आरोपी सोनू हा महिलेचा नातेवाईक असून अनिता आणि सोनू यांची एका लग्नसमारंभात तीन वर्षांपूर्वी भेट झालेली होती त्यानंतर ते एकमेकांसोबत बोलू लागले आणि याच दरम्यान आरोपी सोनू याने राजेंद्र बाबु याला त्याच्या कुटुंबासह नोएडा येथील कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणात काम असते तिथे राहायला या असे सांगितले त्यामुळे कुटुंबासह राजेंद्र बाबू हे नोएडा येथे आलेले होते.
राजेंद्र बाबू कामावर गेल्यानंतर अनेकदा सोनू त्यांच्या घरी जात असायचा आणि अनिता हिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचा त्यानंतर दोन वेळा अनिता ही गरोदर देखील राहिलेली होती मात्र सोनू याने स्वतःचे लग्न जमल्यानंतर तिच्यासोबत हळूहळू संपर्क कमी करायला सुरुवात केली आणि त्यावरून अनिता आणि त्याच्यात वाद सुरू झालेले होते.
शुक्रवारी सोनू याने अनिता हिला ओयो हॉटेलच्या एका रूममध्ये बोलावलेले होते त्यानंतर त्यांनी शारीरिक संबंध ठेवले आणि अनिता हीने त्याला टाळत असल्याबद्दल जाब विचारला त्यावरून त्यांच्यामध्ये भांडण सुरू झाले. आरोपी सोनू याने अनिता हिच्या डोक्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर वार केलेले असून ती रक्तबंबळ होऊन मृत्युमुखी पडल्यानंतर आरोपीने तिथे पुरावा नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला मात्र अखेर त्याने तिचा मृतदेह तिथेच टाकून दिला आणि हॉटेलमधून पलायन केले . पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेले असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.