महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार पुण्यात समोर आलेला असून आयुर्वेदिक उपचार केंद्राच्या नावाखाली चक्क वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. सिंहगड रस्त्यावरील माणिक बाग परिसरात आयुर्वेद उपचार केंद्र नावाखाली हा प्रकार सुरू होता त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाने तिथे छापा टाकला आणि दोन महिलांना ताब्यात घेतले. केंद्राच्या मालकासह दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावर माणिकबाग परिसरात एका इमारतीत आयुर्वेद उपचार केंद्राच्या नावाखाली हा प्रकार सुरू होता. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला याबाबत माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तात्काळ बनावट ग्राहक पाठवून खात्री करून घेतली आणि त्यानंतर तिथे छापा टाकला. दोन महिलांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले असून उपचार केंद्राचा मालक आणि व्यवस्थापक यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत . घटनास्थळावरून पोलिसांनी मोबाईल संच आणि रोख रक्कम जप्त केलेली आहे.
सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्याने अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे.