पुणे जिल्ह्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून एका पोलीस पाटलाने शाळकरी मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवत त्यांच्यासोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आलेला होता. खेड तालुक्यातील वांजळे येथील ही घटना असून या प्रकरणी न्यायालयाने आरोपी पोलीस पाटलाला पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावलेली आहे. राजगुरुनगर अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस एम राजुरकर यांनी मंगळवारी हा निर्णय दिलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, गंगाराम नामदेव खंडे ( वय 60 ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपी पोलीस पाटलाचे नाव असून वांजळे येथील तीन शाळकरी मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवत या पोलीस पाटलाने त्यांच्यासोबत अश्लील वर्तन केलेले होते. 2016 मध्ये ही घटना घडली होती त्यानंतर आरोपीच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
पिढीत मुलींपैकी एक दोन जण पाचवी आणि एक जण सहावीत शिकत आहे. आरोपी हा या तिन्ही मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवत त्याच्या घरात घेऊन गेला आणि त्यानंतर त्याने दरवाजाला आतून कडी लावली अन तिघींची पप्पी घेतली आणि त्यांच्यासोबत त्यांच्या अंगावरून हात फिरवत अश्लील चाळे केले.
मुलींनी घरी पोहोचल्यानंतर आपल्या कुटुंबीयांना ही बाब सांगितली आणि त्यानंतर प्रकरण पोलिसात गेले . पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर आरोपी हा येरवडा कारागृहात होता. राजगुरुनगर न्यायालयात हा खटला सुरू होता त्यावर अखेर निकाल देण्यात आलेला असून सरकारी वकील असलेले पीएस अग्रवाल यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य मानत आरोपीला शिक्षा ठोठावलेली आहे.