बायकोला सरपंचपद सोडायला सांग , पुण्यात महिलेच्या पतीला मारहाण

Spread the love

पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून एका महिलेने सरपंच पदाचा राजीनामा द्यावा म्हणून तिच्या पतीच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून त्यास जखमी करण्यात आलेले आहे सोबतच त्याला जीवे मारण्याची देखील धमकी देण्यात आलेली आहे. त्यांच्या महागड्या गाडीचे नुकसान देखील करण्यात आलेले असून याप्रकरणी तब्बल 17 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुळशी तालुक्यातील माणगाव येथे 30 तारखेला रात्री सव्वाच्या सुमारास ही घटना घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सचिन मच्छिंद्र आढाव ( वय 39 राहणार गणेश नगर डांगे चौक ) असे तक्रारदार व्यक्ती यांचे नाव असून त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिलेली आहे . रवी बोडके , राज बहिरट ,प्रदीप पारखी ,सोन्या बोडके, सचिन बोडके ( राहणार मान तालुका मुळशी ) व इतर दहा ते बारा जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे.

फिर्यादी सचिन आढाव यांच्या पत्नी अर्चना आढाव या माणगावच्या सरपंच आहेत. त्यांनी सरपंच पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा यासाठी आरोपींनी हातात सिमेंटचा ब्लॉक घेऊन सुरुवातीला त्यांच्या महागड्या गाडीचे नुकसान केले आणि त्यानंतर संगणमत करून त्यांच्या पतीच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून तुला जिवे मारतो असे म्हणून त्यांना जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मुदत याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.


Spread the love