तरुणीनेच स्वतःचा ‘ आक्षेपार्ह ‘ व्हिडीओ केला व्हायरल पण .. , पुण्यातील प्रकरण

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर एका तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवण्यात आले आणि त्यानंतर त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल करून त्याची बदनामी करण्यात आली. खराडी येथील एका तरुणीवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून वाघोली येथील या तरुणांने लोणीकंद पोलिसात याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, वाघोली येथील लोहगाव रोडवरील एका सोसायटीमध्ये वास्तव्याला असणाऱ्या एका तरुणाची सोशल मीडियावर एका तरुणीसोबत ओळख झालेली होती त्यानंतर त्या दोघांनी शारीरिक संबंध देखील ठेवले मात्र तरुणीने त्यानंतर त्याला पैशाची मागणी सुरू केली.

तरुणांने सुरुवातीला तिला काही प्रमाणात पैसे देखील दिले मात्र त्यानंतर तिच्या मागण्यापुढे तो हतबल झाला आणि त्याने पैसे देणे बंद केले. त्यानंतर तरुणीने बनवलेल्या व्हिडिओमध्ये स्वतःचा येत असलेला काही भाग कट करून तरुणाचाच शारीरिक संबंध ठेवतानाचा भाग सोशल मीडियात व्हायरल करून दिला. हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित तरुणांने याप्रकरणी पोलिसात धाव घेत तरुणीच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला आहे.


Spread the love