पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार चाकण औद्योगिक वसाहतीतील निघोजे तालुका खेड इथे समोर आलेला असून तृतीयपंथीय व्यक्तींनी दोन तरुणांना अडवत चक्क लुटलेले आहे. 30 एप्रिल रोजी ही घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, स्वप्निल मधुकर थेऊनकर ( वय 31 वर्ष ) असे तक्रारदार व्यक्ती यांचे नाव असून ते त्यांच्या मित्रासोबत कामावरून सुटल्यानंतर घरी जात होते. तळवडे ते महाळुंगे रस्त्यावर महिंद्रा सर्कल जवळ दोन तृतीयपंथी व्यक्तींनी त्यांच्यासमोर येऊन टाळ्या वाजवल्या आणि त्यांच्या दुचाकीला ते आडवे आले त्यानंतर त्यांनी तुम्ही आमच्या सोबत चला असा आग्रह धरला.
फिर्यादी व्यक्ती आणि त्यांच्यासोबत असलेली व्यक्ती यांनी त्यांना नकार दिल्यानंतर त्यांनी फिर्यादीला पकडले आणि त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतली . दोन तृतीयपंथीय व्यक्तींच्या विरोधात महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 392 506 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोलीस हवालदार शिकारे करत असल्याची माहिती आहे .