अनेकदा अनैतिक संबंधातून जन्मलेले मुल किंवा नको असलेले मुल सोडून जाण्याचे प्रकार समोर आलेले आहेत मात्र मध्य प्रदेशात एक वेगळीच घटना समोर आलेले असून स्वतःच्या चार लहान मुलांना सोडून आई वडील वडील पळून गेल्याचा प्रकार समोर आलेला आहे. चार चिमुरडी लेकरे आई-वडिलांची वाट पाहत बसली मात्र ते काही परत आले नाहीत त्यानंतर इंदोर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केलेला आहे.
मध्यप्रदेशातील इंदोर येथील शासकीय महाराजा यशवंत रुग्णालयासमोर चार लहान मुले रडताना आढळून आलेली होती. त्यांचे वय दोन ते आठ वर्षांच्या मध्ये असून संयोगितागंज पोलीस स्टेशनचे प्रभारी असलेले तहजीब काजी यांना हा प्रकार लक्षात आला त्यावेळी त्यांनी मुलांची विचारपूस केली त्यावेळी ही मुले बडवानी जिल्ह्यातील असल्याचे समोर आले.
मुलांच्या आई-वडिलांनी त्यांना तुम्हाला खायला काहीतरी घेऊन येतो असे म्हणून ते गेले ते पुन्हा आलेच नाहीत. मुले बराच वेळ त्यांची वाट पाहत बसले मात्र ते आले नाही म्हणून मुलांनी रडायला सुरुवात केलेले होते याच दरम्यान पोलीस अधिकारी यांची त्यांच्यावर नजर पडली आणि त्यांनी चौकशी केली त्यावेळी हे प्रकरण समोर आलेले आहे. पोलिसांनी या मुलांना आता एका स्वयंसेवी संस्थेला सोपवलेले असून लहान मुलांमध्ये चार आणि दोन वर्षाची मुले तसेच सहा आणि आठ वर्षांच्या दोन मुली आहेत.