अल्पवयीन प्रेयसीला रात्री भेटायला गेला अन जीव गमावून बसला , महाराष्ट्रातील घटना

Spread the love

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना कोल्हापुरात समोर आलेली असून अल्पवयीन प्रेयसीला भेटायला गेल्यानंतर अल्पवयीन प्रियकर हा तिच्या घरच्यांच्या ताब्यात सापडला आणि त्यांनी त्याला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली त्यानंतर त्याला झाडाला देखील बांधले आणि पोलिसांना फोन करण्यात आला मात्र त्याने दोरीला हिसका देऊन तेथून पलायन केले. पळून जात असतानाच तेथील एका विहिरीत पडून त्याचा मृत्यू झालेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, शुभंकर संजय कांबळे ( वय 17 राहणार वाघीघोल तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर ) असे मयत अल्पवयीन मुलाचे नाव असून पोलीस पाटील शिल्पा कांबळे यांनी भुदरगड पोलिसात या प्रकरणी तक्रार दिलेली आहे. शनिवारी रात्री पाचर्डे येथील अल्पवयीन प्रेयसीच्या घरी तो पोहोचलेला होता. रात्री अडीचच्या सुमारास तिच्या घरचे बाहेर गेलेले असताना अचानकपणे ते आले त्यावेळी ही अल्पवयीन प्रेयसी आणि शुभंकर हा झाडाखाली उभे असल्याचे त्यांना दिसून आले. अशोक गोविंद कांबळे यांनी त्यांना एकमेकांपासून वेगळे केले आणि त्यानंतर त्याच्या उजव्या हाताला दोरी बांधून त्याला आंब्याच्या झाडाला बांधले आणि पोलिसांना फोन करण्यात आला. पोलीस पाटील शिल्पा कांबळे तात्काळ तिथे दाखल देखील झाल्या होत्या .

पहाटेच्या सुमारास शुभंकर याने बांधलेल्या दोरीला हिसका दिला आणि तिथून पळण्याचा प्रयत्न केला त्यानंतर गावातील लोक त्याला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागे लागले त्यावेळी अंधारात त्याला विहीर दिसली नाही आणि तो धोंडीराम गोविंद लाड यांच्या शेतातील विहिरीत पडला. त्यात त्याचा मृत्यू झालेला असून सदर प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे .


Spread the love