पुणे जिल्ह्यात शिरूरजवळ महिलेने उचलले टोकाचे पाऊल , गुंतागुंतीचे प्रकरण

Spread the love

पुणे जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना शिरूर रामलिंग इथे समोर आलेले असून एका 33 वर्षीय महिलेने आठ तारखेला दुपारी चारच्या सुमारास राहत्या घरात सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून ज्ञानदेव आप्पासाहेब गायकवाड ( राहणार श्रीगोंदा ) यांनी याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अंजली ज्ञानदेव गायकवाड ( वय 33 राहणार रामलिंग तालुका शिरूर ) असे मयत महिलेचे नाव असून आठ तारखेला दुपारी चारच्या सुमारास अंजली यांची मुलगी शालाका हीने तक्रारदार व्यक्ती यांना फोन करून अंजली यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिलेली होती त्यानंतर त्यांना तात्काळ वेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता.

अंजली गायकवाड यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली असल्याचे बोलले जात आहे मात्र ही सुसाईड नोट पोलीस तपासात आढळून आलेली नाही त्यामध्ये शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका व्यक्तीचे नाव असून सदर सुसाईड नोट पोलिसांना मिळाली नसल्याकारणाने या प्रकरणात गुंतागुंत वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे


Spread the love