‘ सॉरी पप्पा सॉरी मम्मी .. ‘ , लॉजचा दरवाजा उघडत नसल्याने संशय आला अन..

Spread the love

आपल्या प्रेयसीचे दुसरीकडे लग्न झाले म्हणून नैराश्यात गेलेल्या एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलण्याची घटना बिहारमध्ये समोर आलेली असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत त्याचा मृतदेह ताब्यात घेतलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा तरुण नैराश्यात गेलेला होता त्यातून त्याने हॉटेलमध्ये एक रूम बुक केले आणि तिथे गळफास घेऊन आत्महत्या केली.

उपलब्ध माहितीनुसार, बिहारच्या हाजीपुर येथील हे प्रकरण असून मयत तरुणाचे नाव रुपेश राज असे असल्याचे समजते. हाजीपुर रेल्वे स्थानकासमोरच्या हॉटेलमध्ये रुपेशने एक रूम बुक केलेली होती. दुसऱ्या दिवशी आपल्याला ट्रेन पकडायची आहे असे सांगत त्याने रूम घेतली मात्र चेकआउट केले नाही त्यानंतर हॉटेलचा कर्मचारी वर गेला त्याने रूमचा दरवाजा ठोठावला मात्र कोणताच प्रतिसाद मिळाला नाही म्हणून कर्मचाऱ्याला संशय आला.

पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा उघडला त्यावेळी रुपेश हा मयत अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडलेली असून त्यामध्ये ‘ सॉरी पप्पा सॉरी मम्मी मी ज्या मुलीवर प्रेम करत होतो तिला तुम्ही कधीच पसंत केले नाही. माझ्या काय इच्छा आहेत हे तुम्ही कधीच मला विचारलं नाही. मी जिच्यावर प्रेम करतो तिचे आज दुसरीकडे लग्न झालेले आहे तिच्याशिवाय मी जगू शकत नाही तर मी इतर कोणत्या मुलीशी लग्न करू शकत नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे ‘ असे लिहिलेले होते. रुपेश हा बिहार येथील रहिवासी असून त्याची प्रेयसी ही उत्तर प्रदेशची रहिवासी होती सदर घटनेनंतर कुटुंबीय पसरलेली आहे.


Spread the love