मावळमधील हत्याकांड प्रकरणी मुख्य सूत्रधार गजाआड , कारणही आले समोर

Spread the love

जनसेवा समितीचे संस्थापक किशोर आवारे

पुण्यात जनसेवा समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या हत्येनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती. भर दिवसा ही घटना घडल्यानंतर संपूर्ण मावळ तालुका हादरून गेलेला होता मात्र पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत अखेर मुख्य सूत्रधाराला ताब्यात घेतलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, गौरव खळदे असे मुख्य आरोपीचे नाव असून तो माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा आहे. गौरव खळदे हा सिविल इंजिनियर असून भानू खळदे यांना काही दिवसांपूर्वी किशोर आवारे यांनी कानशिलात लगावलेली होती त्याचा बदला घेण्यावरून गौरव याचे मित्र त्याला सातत्याने चिडवत असायचे म्हणून अखेर त्याने जानेवारी महिन्यापासून किशोर आवारे यांच्या हत्येचा कट केला आणि त्यानंतर अखेर त्यांची हत्या केली.

काही महिन्यांपूर्वी गौरव खळदे याचे वडील आणि किशोर आवारे यांच्यात काही कारणावरून वाद झालेले होते त्यावेळी किशोर आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानशिलात लगावलेली होती. आपल्या वडिलांना किशोर आवारे यांनी मारल्यानंतर बदला घेण्यासाठी गौरव मनात राग धरून होता आणि अशातच त्याचे मित्र त्याला सातत्याने चिडवत होते म्हणून त्याने अखेर वडिलांचा बदला घेण्याच्या उद्देशाने अत्यंत क्रूरतेने किशोर आवारे यांचा काटा काढल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे.

जानेवारी महिन्यापासून गौरव हा किशोर आवारे यांची हत्या करण्यासाठी रेकी करत होता. तळेगाव नगर परिषदेसमोरच किशोर आवारे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी इतर आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या असून काही तासातच मुख्य आरोपी देखील पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे. सदर घटनेनंतर मावळ तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.


Spread the love