म्हशीचं दूध काढायला यायचा अन.., अखेर धागेदोरे पत्नीपर्यंतच जाऊन पोहचले

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक असे अनैतिक संबंधाचे प्रकरण सध्या सोलापूर जिल्ह्यात समोर आलेले असून विवाहसंबंधात अडथळा ठरणाऱ्या एका पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने डोक्यात वार करून खून केलेला आहे त्यानंतर त्याचे प्रेत कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात फेकून दिलेले असून वीस दिवसानंतर पोलिसांनी या प्रकरणी मयत व्यक्तीच्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, दादासाहेब पवार ( वय 36 वर्ष ) हे 26 एप्रिलपासून बेपत्ता झालेले होते त्यानंतर 30 एप्रिल रोजी ते बेपत्ता झाल्याप्रकरणी पोलिसात फिर्याद देण्यात आली त्यानंतर 28 एप्रिल रोजी कुरुल हद्दीतील एका कॅनॉलमध्ये यांचा मृतदेह आढळून आलेला होता. मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली त्यानंतर जे काही सत्य आले ते देखील तितकेच भयावह होते.

दुधाचा व्यवसाय करणारा अमोल पांढरे नावाचा एक व्यक्ती गेल्या सहा महिन्यांपासून दादासाहेब पवार यांच्या वस्तीवर दूध काढण्यासाठी येत असायचा याच दरम्यान दादासाहेब यांची पत्नी रंजना आणि अमोल पांढरे यांच्यात अनैतिक संबंध असून या प्रकरणाची कल्पना दादासाहेब यांना आली त्यामुळे 26 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास रंजना आणि अमोल यांनी दादासाहेब पवार यांच्या डोक्यात धारदार शास्त्राने वार करून त्यांचा खून केला.

खून केल्यानंतर पुरावा लपवण्याच्या उद्देशाने त्यांनी दादासाहेब यांचे प्रेत कॅनॉलमध्ये टाकून दिले. 28 एप्रिल रोजी त्यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी तपास केला त्यावेळी रंजना हिचे अमोल याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. अमोल कृष्णा पांढरे आणि रंजना दादासाहेब पवार अशी आरोपींची नावे असून त्यांच्या विरोधात कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


Spread the love