आंतरजातीय आळंदीत करून मंगल कार्यालयात स्वजातीतील सुरु असतानाच ..

Spread the love

महाराष्ट्रात एक अजब असा प्रकार समोर आलेला असून पळून जाऊन आळंदीतील एका मंगल कार्यालयात आंतरजातीय वैदिक पद्धतीने लग्न केल्यानंतर जिच्यासोबत लग्न केले तिला अंधारात ठेवत स्वतःच्या जातीतील मुलीशी लग्न करण्याच्या तयारीत असलेल्या एका पतीचा विवाह त्याच्या पत्नीने उधळून लावलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील ही घटना आहे.

उपलब्ध माहितीनुसार , मध्यप्रदेशातील असलेला एक युवक आणि बऱ्हाणपूर शहरातील एक तरुणी यांचा आळंदीत वैदिक पद्धतीने एक महिन्यांपूर्वी विवाह झालेला होता. महिन्याभरात अभियंता असलेल्या या व्यक्तीने तिच्याकडून चार लाख रुपये उकळले आणि त्यानंतर तिला अंधारात ठेवत स्वतःच्या जातीतील एका पदवीधर युवतीशी विवाह निश्चित केलेला होता.

दरम्यानच्या काळात जिच्यासोबत आळंदीला लग्न केले तिला याची माहिती समजली आणि शनिवारी रावेर शहरातील बऱ्हाणपूर रोडवरील एका मंगल कार्यालयात ती येऊन धडकली. नवविवाहित पत्नीने त्याचा हा विवाह रोखलेला असून आपले लग्न झालेले असल्याचे सगळे पुरावे आणि फोटो अल्बम तिने पोलिसांपुढे ठेवले त्यामुळे पोलीस देखील निशब्द झाले.


Spread the love