महाराष्ट्रात खळबळजनक प्रकरण नाशिक इथे समोर आलेले असून एका बेरोजगार युवतीला नोकरीचे आमिष दाखवत चक्क देहविक्री करण्यास भाग पाडलेले आहे. पंचवटी पोलिसात याप्रकरणी एका संशयित दांपत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पीडित तरुणीचे वय 21 वर्ष असून संशयित महिला आणि तिचा पती परेश सुराणा यांनी तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत बळजबरीने 15 ते 25 फेब्रुवारी दरम्यान शारीरिक संबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केले असे फिर्यादीत म्हटलेले आहे.
फेब्रुवारी महिन्यात तिची सुराणा दांपत्याची ओळख झालेली होती त्यावेळी या दांपत्याने तिचे राहते घर गाठले आणि तिला शॉपिंगला जायचे आहे असे सांगत तिला सोबत घेतले. ती आपल्या बेडरूम मध्ये कपडे बदलण्यासाठी गेलेली असताना संशयित आरोपी याने मोबाईलद्वारे तिचे व्हिडिओ शूटिंग केले आणि हे व्हायरल करण्याची धमकी दिली.
तरुणीच्या म्हणण्याप्रमाणे दोन दिवसांनी संशयित परेश याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिला इतर ग्राहकांकडे पाठवून जबरदस्तीने देहविक्रय करण्यास भाग पाडले. सातत्याने त्यांच्याकडून दबाव आणि छळ वाढत असल्याने अखेर पीडित तरुणीने पंचवटी पोलीस ठाणे गाठत त्यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे.