पुणे हादरलं.. ‘ सोन्या ‘ उभा असतानाच मोटारसायकल आली अन..

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून पिंपरीत भरदिवसा एका तरुणावर मित्रांनीच गोळीबार करून त्याची अमानुषपणे हत्या केली आहे. सोमवारी 22 तारखेला दुपारी पावणे दोनच्या सुमारास चिखली गावाच्या कमानीजवळ ही घटना घडलेली असून यात या तरुणाचा मृत्यू झालेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, कृष्णा उर्फ सोन्या हरिभाऊ तापकीर ( वय 20 ) असे मयत व्यक्तीचे नाव असून सौरभ उर्फ सोन्या पानसरे ( राहणार तालुका खेड ) आणि सिद्धार्थ कांबळे अशी आरोपी व्यक्तींची नावे आहेत.

चिखली गावातील मुख्य कमानी जवळ सोन्या उभा होता त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्याच्यावर गोळीबार करत तिथून पळ काढला त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आरोपींनी तीन ते चार राऊंड सोन्यावर फायर केले अशी प्राथमिक माहिती मिळालेली असून पूर्व वैमानस्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे . पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.