सात वर्ष सात जणांकडून अत्याचार , आरोपी पोलीस अधीक्षक कार्यालयात आला अन..

Spread the love

काही दिवसांपूर्वी बीड शहरात तब्बल सात वर्ष सात जणांनी एका महिलेवर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आलेले होते. या प्रकरणातील एका आरोपीने माझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे असा आरोप करत चक्क पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पेटवून घेतलेले होते त्यामध्ये तो 52% भाजलेला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडलेला होता.

उपलब्ध माहितीनुसार, संदीप पिंपळे ( राहणार कबाड गल्ली बीड ) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून माजलगाव येथील एका हॉटेलला मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या महिलेने संदीप याच्यासोबतच बालाजी इंगोले, गोरख इंगोले ( दोघेही राहणार धानोरा तालुका बीड ) आणि इतर चार लोकांनी आपल्यावर अत्याचार केल्याची फिर्याद पोलिसात दिलेली होती. आरोपी संदीप याने आपल्यावर अत्याचार करून त्याचा व्हिडिओ बनवत ब्लॅकमेल करत त्यानंतर इतरांनी देखील अशाच पद्धतीने तब्बल सात वर्ष आपल्यावर अत्याचार केले असे पीडितेचे म्हणणे आहे.

2014 पासून तर 2021 पर्यंत अशी सात वर्ष आपल्यावर अत्याचार करण्यात आले असे या महिलेने म्हटलेले होते . सदर प्रकरणात पोलिसांनी एकाही आरोपीला अद्यापपर्यंत अटक केलेली नव्हती. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता संदीप हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आला आणि त्याने अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेतले . त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून तो 52 टक्के भाजलेला आहे . त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्याविरोधात आता आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

तब्बल सात वर्षांपासून या महिलेवर आरोपी अत्याचार करत होते. संदीप पिंपळे हा रिक्षाचालक असून तक्रारदार महिलेची बॅग रिक्षात विसरली म्हणून बॅग परत करण्याच्या बहाण्याने त्याने तिला एका ठिकाणी बोलावले होते आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. काही दिवसानंतर अशाच पद्धतीने इतरही आरोपी यांनी आपल्यावर अत्याचार केलेले आहेत असे या महिलेचे म्हणणे आहे. बीड जिल्ह्यातील एका घाटात चार जणांनी सहा तास आपल्यावर अत्याचार केले आणि त्यातून आपल्याला दिवसही गेले होते असे महिलेचे म्हणणे होते . पोलिसांनी एकाही आरोपीला अद्यापपर्यंत अटक केलेली नाही त्यामुळे इतरही आरोपी असा प्रकार करण्याची भीती निर्माण झालेली आहे .


Spread the love