राज्यात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना अमरावती इथे उघडकीस आली असून एका ५४ वर्षीय विवाहित महिला शिक्षिकेची ३४ वर्षीय युवकासोबत एक वर्षापूर्वी मैत्री झाली आणि त्यानंतर या युवकाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढत चांगलाच चुना लावला आहे . दोघांच्या वयात तब्बल २० वर्षांचे अंतर असून सदर शिक्षकेला या तरुणाने ‘ अगं प्रेमाला वयाचे बंधन नसते ‘ असे सांगत आपल्या जाळ्यात अडकवले.
उपलब्ध माहितीनुसार ,परतवाड्यापासून जवळच असलेल्या एका खेड्यात हा प्रियकर राहतो . एक वर्षांपूर्वी त्याची या शिक्षिकेसोबत ओळख झाली होती . पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यावर त्याने वेळोवेळी या शिक्षिकेसोबत फोटो देखील काढले तसेच वेळोवेळी तिच्याकडून आर्थिक मदत देखील घेतली आणि त्या मदतीची त्याला चटकच लागली.
काही दिवसांपूर्वी व्यवसाय सुरू करण्याकरिता त्या प्रियकर युवकाने पैसे मागितले तेव्हा शिक्षिकेने पैसे देण्यास नकार दिला यावर त्याने ‘ पैसे दे नाही, तर व्हाॅट्सॲपवरील मेसेज आणि तुझे सर्व फोटो व्हाट्सअपवर जाहीर करेल. तू जर पैसे दिले नाही, तर तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकेन’ अशी धमकीही दिली तसेच पीडित शिक्षिकेला आणि तिच्या परिवाराला चारित्र्यावरून शिवीगाळ देखील केली.
काही दिवस गेल्यावर त्याने तिचा पाठलाग करून तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला यावेळी त्या महिला शिक्षिकेने त्यास समजाविण्याचा प्रयत्नही केला मात्र त्याच्या वर्तनात बदल झाला नाही अखेर त्या महिला शिक्षिकेने परतवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. परतवाडा पोलिसांनी त्या ३४ वर्षीय युवकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस.पी. राऊत या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.