पुणे हादरलं..बायको अन माहेरच्या लोकांकडून त्रास असह्य झाल्याने..

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक खळबळजनक अशी घटना हडपसर परिसरात समोर आलेली असून एका व्यक्तीने पत्नीच्या माहेरच्या व्यक्तींकडून सातत्याने त्रास होत असल्याने अखेर आत्महत्या केलेली आहे. मयत व्यक्तीला त्याची पत्नी सासू-सासरे मेहुना आणि एक व्यक्ती यांच्याकडून मानसिक त्रास दिला जात होता त्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले अशी चर्चा आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अभय गवळी असे मयत व्यक्ती यांचे नाव असून त्यांच्या आत्महत्येनंतर त्यांची पत्नी तृप्ती अभय गवळी , सासू उषा जालिंदर आंबवडे ,सासरे जालिंदर आंबवडे, मेहुना संतोष आंबवडे आणि सारिका अंबवडे या पाच जणांच्या विरोधात हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

अभय गवळी आणि तृप्ती गवळी यांचे जानेवारी 2014 मध्ये लग्न झालेले होते त्यानंतर ते शेवाळेवाडी येथील येथे राहण्यात आले. त्यांचा विवाह झाल्यापासूनच माहेरच्या व्यक्तींची संसारात सातत्याने लुडबुड सुरू होती . आपली त्यांची पत्नी असलेली तृप्ती ही देखील आई-वडिलांच्या सांगण्यानुसार वागत असल्याने अभय आणि तृप्ती यांच्यात वाद होऊ लागले होते त्यानंतर सतत त्यांच्याकडून अभय यांना मानसिक त्रास दिला जात होता त्यातून त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.


Spread the love