महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना मुंबई इथे उघडकीस आली आहे. मुंबईमधील आरे पोलिसांनी एका विद्यार्थ्याला अटक केली असून त्याने चक्क त्याच्या शिक्षिकेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि तिच्यासोबत शारीरिक संबध प्रस्थापित केले मात्र त्यानंतर त्याने वेळोवेळी तिला ह्या शारीरिक संबंधांचा व्हिडीओ सदर शिक्षिकेच्या पतीला पाठवण्याची धमकी देत तिच्याकडून तब्बल आठ लाख रुपये उकळले. कृष्णकांत अखोरी (वय २५ ) असे आरोपीचे नाव असल्याचे समजते .
उपलब्ध माहितीनुसार , आरे येथील रॉयल पाल्ममध्ये ही शिक्षिका राहण्यास असून 2016 मध्ये बिहारच्या पटना येथे ती पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लास घेत होती त्यावेळी तिची आणि आरोपीची ओळख झाली . तिच्या क्लासमध्ये हा शिक्षण घेत होता तेव्हा त्यांची ओळख झाली आणि या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. हळूहळू भेटीगाठी वाढल्या आणि याचदरम्यान आरोपीने या शिक्षिकेसोबत शारीरिक संबध देखील प्रस्थापित केले मात्र या दरम्यान आरोपीने सदर प्रकारचा व्हिडीओ देखील बनवला आणि त्याचा आधार घेत तो या शिक्षिकेला वारंवार शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करू लागला.
महिला शिक्षिका जेव्हा आपल्या पतीसोबत मुंबईला राहायला गेली तेव्हा कृष्णकांत अखोरीने ते व्हिडीओ पतीला पाठवण्याची धमकी देऊन शिक्षकेकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली.काही कालावधीत त्याच्या या प्रकाराचा शिक्षिकेला त्रास होऊ लागला आणि तिने त्याच्याशी संबध तोडून टाकण्याची भाषा सुरु करताच आरोपीने हा व्हिडीओ महिलेच्या पतीला पाठवण्याची धमकी दिली. मात्र तरीदेखील शिक्षिका आपल्या मतावर ठाम राहिल्याने आरोपीने हा व्हिडीओ चक्क शिक्षिकेच्या पतीला पाठवून देखील दिला. पतीच्या मोबाईलवर आपला ‘ तसला ‘ व्हिडीओ पाहून शिक्षिकेला धक्काच बसला आणि तिने याबद्दल पोलिसात तक्रार दिली.
आरे पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल होताच पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला आणि कृष्णकांत आखोरीला दिल्लीच्या संगम विहारमधून अटक केली आणि त्याला कोर्टात हजर केले असता त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे . महिला शिक्षिकेच्या पतीने या संदर्भात आरे पोलीस स्टेशनमध्ये कृष्णकांत अखोरीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कलम 385, 354 (अ) आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे .