सोशल मीडियावर सध्या एका विवाहाची जोरदार चर्चा सुरू असून लग्नाची सप्तपदी होण्याच्या आधी एका नवऱ्या मुलीने पोटात दुखत असल्याचा बहाणा करत तसेच उलट्या होत असल्याचे नाटक करत प्रियकरासोबत पळ काढलेला होता त्यामुळे नवरदेव आणि लग्नासाठी आलेल्या मंडळीची चांगलीच गोची झाली मात्र नवरदेव देखील खमका निघालेला असून तब्बल तेरा दिवस तो मुलीला घेऊनच जाणार या अट्टाहासाने सासरीच थांबला. तेरा दिवसांनी अखेर या मुलीचा शोध लागला आणि त्यानंतर तिचे लग्न लावून देण्यात आले.
लग्नाची सर्व तयारी झालेली असताना अवघ्या काही वेळात अक्षता अंगावर पडतील आणि त्यानंतर नवरी मुलीला घेऊन आपण आपल्या घरी निघून जाऊ असे स्वप्न रंगवत नवरदेव मांडवात दाखल झालेला होता मात्र नवरी मुलीने अचानक आपल्या पोटात दुखत आहे आणि आपल्याला उलट्या होत आहेत असा बहाना बनवला आणि त्यानंतर ती प्रियकरासोबत पळून गेली. नवरदेवाला आता आपले लग्न लागणार नाही याची जाणीव झालेली होती मात्र त्याने जिद्द सोडली नाही.
नवरदेव नाराज झाला आणि त्याने नवरी पळून गेलेली आहे तिला काहीही करून परत घेऊन या आणि माझ्यासोबत लग्न लावून द्या असा अट्टाहास त्याने धरला आणि नवरीकडच्या मंडळींनी तिला शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. तब्बल चार दिवस उलटले तरी ती आली नाही तरीदेखील नवरदेव डोक्यात बांधलेला फेटा खाली काढत नव्हता तसेच मुलीच्या घरातून निघण्याची देखील नाव घेत नव्हता तब्बल तेरा दिवसांनी या मुलीची माहिती समजली आणि पोलिसांनी तिला ताब्यात घेतले
तेरा दिवसानंतर अखेर विधीवत त्यांचे लग्न लावण्यात आलेले असून चार मे रोजी या लग्नाची तारीख होती. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील पाली येथील हे प्रकरण असून श्रवण असे या नवरदेवाचे नाव आहे तर मनीषा असे नवरीचे नाव आहे. चार मे रोजी सकाळी त्यांचे लग्न ठरलेले होते मात्र मनीषा प्रियकरासोबत गायब झालेली होती . शौचालयाला जाते असे सांगून ती गेली ती पुन्हा आलीच नाही . तब्बल तेरा दिवस नवरी मुलीच्या प्रतीक्षेत नवरदेवाने डोक्यावरचा फेटा काढलेला नव्हता अखेर नवरी सापडल्यानंतर तेरा दिवसांनी म्हणजेच 15 मे रोजी त्यांचे लग्न लावून देण्यात आले आणि त्यानंतर तिला सासरी पाठवण्यात आलेले आहे.