सार्वजनिक ठिकाणी ‘ नको ते ‘ होते सुरु , पोलीस आल्यावरच झाले बाजूला

Spread the love

प्रेम ही खाजगी गोष्ट असल्याने सार्वजनिक ठिकाणी तरी भान ठेवण्याचा सल्ला कित्येकदा प्रशासनाकडून दिला जातो मात्र कधी कधी प्रेमात झिंगाट झालेल्या जोडप्याना याचे भान राहत नाही आणि प्रकरण पोलिसात जाते. असाच काहीसा प्रकार घडलेला असून सार्वजनिक ठिकाणी ‘ नको ते ‘ करत असताना एका प्रेमी युगुलाला पोलिसांनी अटक केली आहे .

धक्कादायक बाब म्हणजे सर्व लोक आपल्याला पाहत आहेत याची त्यांना देखील कल्पना होती मात्र ते इतके धुंद झालेले होते की अखेर पोलीस आल्यावरच ते बाजूला झाले. काही उत्साही लोकांनी ह्या घटनेचा व्हिडीओ देखील मोबाईलमध्ये शूट करून घेतला आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांना या प्रकाराची कल्पना दिली. त्यांचा हा कारनामा सोशल मीडियात देखील चांगलाच व्हायरल झाला आहे .

डेली स्टारनं याबद्दल वृत्त दिले असून घटना ब्राझिलमधील रियो डी जनेरियोच्या काबो फ्रिओ या समुद्रकिनाऱ्यावर घडली आहे . सार्वजनिक ठिकाणी सर्वांच्या समोर ‘ नको ते ‘ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे . पकडलं त्यावेळी दोघेही अर्धनग्न अवस्थेत होते. काही जणांनी त्यांना आवाज देऊन सावध करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी पर्यटकांकडे असल्या फालतू मागणीकडे सपशेल दुर्लक्ष केले. दरम्यान घटनास्थळी पोलीस आले अन् त्यांनी दोघांना अटक केली.

पोलीस स्टेशनला नेल्यांनंतर त्यांची वैद्यकीय तपासणी केली असताना त्यांनी कुठलेच अंमली पदार्थांचं सेवन अथवा दारूचे देखील सेवन केलेले नसल्याचे समोर आले आहे . पूर्णपणे शुद्धीत असताना त्यांनी हा प्रकार केलाच कसा ? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. एखाद्या कपलने सार्वजनिक ठिकाणी लैंगिक संबंध ठेवल्याने कायदेशीर अडचणीत अडकल्याची ही पहिली वेळ नाही मात्र सदर प्रकाराची ब्राझीलमध्ये चांगलीच चर्चा रंगलेली आहे .


Spread the love