गूढ उलगडलं..रात्रीच्या पार्टीत सपना आणि राणी भिडल्या अन त्यानंतर..

Spread the love

देशात एक खळबळजनक असे प्रकरण उत्तर दिल्ली इथे समोर आलेले असून सिव्हिल लाईन परिसरात मजनु का टीला इथे एका महिलेने तिच्या मैत्रिणीची अत्यंत अमानुषपणे हत्या केलेली आहे . ज्या महिलेने केली तिचे नाव सपना असून तिने तिची मैत्रीण असलेली राणी ( वय 35 ) हिचा जीव घेतलेला आहे . आतापर्यंतच्या पोलीस तपासात राणी हिने पार्टीमध्ये सपना हिच्या मयत असलेल्या वडिलांबद्दल आक्षेपार्ह शब्द उच्चारले होते त्यामुळे सपना हिने हा प्रकार केला असे समोर आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, राणी ही मूळची पश्चिम बंगालची असून तिची मैत्रीण असलेली सपना हिच्यासोबत ती मजनु का टीला परिसरात राहत होती . तिच्या आई-वडिलांचा मृत्यू झालेला असून ती गुरुग्राम येथील एका ब्युटी पार्लरमध्ये नोकरी करत होती तर सपना हिचा देखील घटस्फोट पंधरा वर्षांपूर्वी झालेला असून तिला एक मुलगी आहे आणि ही मुलगी देखील नवऱ्याकडेच राहायला असल्यामुळे सपना आणि राणी या दोघी सोबत राहत होत्या.

सपना ही दिल्लीमध्ये वेटर म्हणून काम करत होती तर राणी ही ब्युटी पार्लरमध्ये काम करत होती. सोमवारी रात्री झालेल्या पार्टीत राणी हिने सपना हिच्या वडिलांना मयत वडिलांना शिवीगाळ केली त्यामुळे संतप्त झालेल्या सपनाने तिच्यावर चाकूने वार केले आणि तिच्या मृतदेहाजवळ बराच काळ बसून राहिली . दीड तासानंतर तिने आपल्या मैत्रिणीचा कुणीतरी खून केलेला आहे अशी माहिती पोलिसांना दिली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर सपना हिच्याकडे विचारपूस सुरू केली त्यावेळी तिने आपण घराच्या छतावर असताना कोणीतरी राणी हिची हत्या करून निघून गेलेले आहे असे पोलिसांना सांगितले. चौकशीच्या दरम्यान तिने तिचा जबाब अनेकदा बदलला त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्या पार्टीबद्दल प्रश्न उपस्थित केले तेव्हा तिने राणी हिच्यासोबत आपला वाद झालेला होता असे देखील सांगितले त्यानंतर पार्टीत नेहा नावाची आणखीन एक तरुणी त्यांच्यासोबत होती तिला देखील चौकशीला बोलावण्यात आले आणि सपना आणि नेहा यांची वेगवेगळी चौकशी करण्यात आली त्यावेळी सपना हिने अखेर हत्येची कबुली दिलेली आहे. पोलिसांनी तात्काळ तिला अटक केलेली आहे


Spread the love