महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून टिटवाळा रेल्वे स्थानकात एक नवजात अर्भक आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. अवघ्या काही दिवसांचे हे बाळ एका पिशवीत गुंडाळलेले आढळून आले अन पोलिसांनी तपास सुरु केला. परिसरातील सीसीटीव्ही आणि महिलेची चालण्याची स्टाईल वगैरेचा तपास करत पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून त्यामागील कारण समोर आल्यावर पोलीस देखील हैराण झाले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, आरोपी महिला डोंबिवलीत राहणारी असून 20 नोव्हेंबरला तिने पोटच्या बाळाला टिटवाळा रेल्वे स्थानकात सोडून पळ काढला होता. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचनं सीसीटीव्हीच्या सहाय्यानं संबंधित महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली असून सदर महिलेनं अनैतिक संबंधातून बाळाला जन्म दिला होता मात्र भविष्यात अडचणी नकोत म्हणून तिने हा धक्कादायक प्रकार केला. पोलिसांनी त्या महिलेला आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.
कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचचे पोलिस अधिकारी अशरद शेख यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सदर महिलेचे एका विवाहित पुरुषासोबत संबंध होते. विवाहित पुरुषाच्या नादात ही महिला इतकी वेडी झाली कि त्यांनी प्रेमाच्या सर्व मर्यादा पार करत वारंवार शारीरिक संबध ठेवले आणि त्यातून तिला दिवस गेले. विवाहित असलेल्या या प्रियकराने तिला घर देखील घेऊन दिले होते. त्यांच्या दोघातील अनैतिक संबंधामुळं तिनं बाळाला जन्म दिला आणि हे बाळ नकोसे झाल्यानं तिनं बाळाला रेल्वे ट्रेनमध्ये सोडलं. या सर्व प्रकारात महिलेचा प्रियकर देखील सहभागी होता त्यामुळे पोलिसांनी महिलेसह तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.
20 नोव्हेंबर रोजी टिटवाळ्याहून ट्रेन निघाली असता एका पिशवीत नवजात बाळ आढळून आले होते. सर्व स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले. त्यावेळी एक महिला कोपर रेल्वे स्थानकातून रेल्वेत बसली असून तिच्या हातात पिशवी असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळलं. तसेच ज्या पिशवीत बाळ सापडलं. ती पिशवी आणि या महिलेच्या हातातील पिशवी एकसारखीच दिसत असल्यानं पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली होती त्यानंतर अखेर त्या महिलेस पकडण्यात आले असून तिचा विवाहित प्रियकर देखील अटकेत आहे.