‘ लुडो ‘ खेळताना जाळ्यात ओढलं अन.. , सिंगापूरवरून आरोपीला आणलं अन..

Spread the love

महाराष्ट्रात एक अजब प्रकरण समोर आलेले असून ऑनलाइन लूडो गेम खेळत असताना एका महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर तिच्याकडून व्हिडिओ कॉलवर जबरदस्तीने अश्लील वर्तन करून घेण्यात आले आणि तिला ती पोस्ट सोशल मीडियात व्हायरल करण्यास सांगितली याप्रकरणी सांगोला न्यायालयाने एका व्यक्तीला तीन वर्षांची सक्तमजुरी आणि 25 हजार रुपयांचा दंड सोबतच पीडित महिलेला दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिलेला आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी केबी सोनवणे यांच्यासमोर ही सुनावणी झालेली होती.

उपलब्ध माहितीनुसार, अमनदीप करमसिंग ( वय 23 राहणार लाखाना थापा जिल्हा पंजाब ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून आरोपीने एका महिलेसोबत ऑनलाइन गेम खेळताना ओळख वाढवलेली होती त्यानंतर त्याने तिला मोबाईलवर आणि व्हिडिओ कॉलवर अनेकदा बोलावले आणि तिचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर ते अपलोड केलेले होते. सांगोला पोलीस ठाण्यात कलम 354 अंतर्गत तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा 67 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आलेला होता.

सदर प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक सुहास कदम यांनी केला आणि आरोपीला सिंगापूर इथून आणण्यास भाग पाडले आणि त्याला अटक केलेली होती. त्याच्या विरोधात सांगोला प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र देखील दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणात न्यायालयाने आठ साक्षीदार तपासले आणि तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे आयुष्य उध्वस्त केले जात असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाकडून करण्यात आला त्यानंतर न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे.


Spread the love