कोरेगाव भीमात ‘ त्या ‘ ठिकाणी सुरू होता वेश्याव्यवसाय , अल्पवयीन मुलगी देखील ..

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात अनेक ठिकाणी हॉटेल्स आणि लॉजवर चोरून लपून वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे प्रकार समोर येत असून अशीच एक ताजी घटना कोरेगाव भीमा इथे समोर आलेली आहे . शिक्रापूर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत तीन जणांना अटक करून एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत तीन जणींची सुटका केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सचिन पंडित विधाटे , शंकर लालबहादूर चित्रे आणि अमोल रामदास डहाळे अशी या प्रकरणातील आरोपींची नावे असून या तिघांनाही अटक करण्यात आलेली आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर यांना गुप्त सूत्रांच्या माध्यमातून या संदर्भात माहिती मिळालेली होती त्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शीळीमकर यांना माहिती दिली आणि त्यानंतर काही सामाजिक कार्यकर्ते आणि महिला पोलिसांचे पथक बनवत हॉटेल सावली इथे एक बनावट ग्राहक पाठवलेले होते.

ग्राहक तिथे पोहोचल्यानंतर ग्राहकाने वेशागमनासाठी महिला पुरवण्याची मागणी केली आणि आरोपींनी या प्रकारास संमती दाखवत पैसे स्वीकारण्याची तयारी दाखवली होती . बनावट ग्राहकाने इशारा केल्यानंतर पोलिसांच्या पथकाने कारवाई करत एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत इतर दोन महिलांना ताब्यात घेतले आणि त्यांची सुटका केली. आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे.


Spread the love