सरकारने लागू केलेल्या योजनांचा कोण कसा फायदा घेईल याचा काही नेम राहिलेला नाही अशीच एक घटना कर्नाटक इथे समोर आलेली असून कर्नाटकमध्ये महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे. काँग्रेस सरकारने सत्तेत येण्याआधी ही घोषणा केलेली होती त्यानंतर सत्तेत येतात अवघ्या काही महिन्यात या गोष्टीची परिपुर्तता करण्यात आली मात्र या सरकारच्या योजनेचा एका विवाहित महिलेने भलताच फायदा घेत आपल्या प्रियकरासोबत पलायन केलेले आहे. सदर महिलेला 11 महिन्यांचे एक बाळ देखील आहे.
उपलब्ध माहितीनुसार, कर्नाटकातील हुबळी येथील राहणारी एक तरुणी पुत्तुर इथे मोलमजुरी करणाऱ्या एका व्यक्तीच्या प्रेमात पडलेली होती . तिच्या प्रेमप्रकरणाविषयी तिच्या घरी समजल्यानंतर आखेर तिच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसरा एका तरुणासोबत लावून दिले त्यानंतर काही दिवसात ती गरोदर झाली आणि बाळंतपणासाठी माहेरी आली होती . माहेरी आल्यानंतर देखील ती सासरी गेली नाही आणि तिचे बाळ पळून गेली अकरा महिन्यांचे झालेले होते.
तब्बल 11 महिने उलटून गेले तरी ती सासरी जायचे नाव घेत नव्हती. तिच्या प्रियकरांनी तिला फोन करून पुत्तुर येथे बोलावून घेतले मात्र तिथे जाण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. लग्न होऊन एक मूल झाले तरी देखील ती आधीच्या प्रियकराच्या संपर्कात आहे हे लक्षात आल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिच्याकडून मोबाईल आणि पैसे काढून घेतलेले होते त्यामुळे ती हतबल झालेली होती.
दरम्यानच्या काळात काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यानंतर महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू झालेली आहे ही माहिती तिला समजली आणि तिने या सेवेचा लाभ उठवत 13 जून रोजी घरातून फरार झाली. प्रकरण समोर आल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी देखील पुत्तुर इथे धाव घेतली मात्र तिथे जाऊनही तिचा प्रियकर आढळून आला नाही हा सर्व प्रकार त्यांनी ठरवून केल्याचे लक्षात आलेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.