दर्शना पवार हत्या प्रकरणात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली असून या प्रकरणातील मुख्य संशयित असलेला राहुल हंडोरे याला मुंबईत अटक करण्यात आलेली आहे . पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई करत राहुल हंडोरे याला अटक केलेली असून लग्नाला नकार मिळाल्याने राहुल याने दर्शना पवार हिची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दर्शना हिच्यासोबत विवाह करण्याची राहुल याची इच्छा होती मात्र एमपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर तिच्या घरच्यांनी तिचा विवाह दुसऱ्या एका मुलासोबत ठरवलेला होता. राहुल याने तिच्या घरच्यांना ‘ मला काही वेळ द्या ‘ अशी विनंती केलेली होती मात्र मुलीच्या घरच्यांनी त्याला नकार दिलेला होता त्यानंतर राहुलने तिची हत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत .
पुण्यातून गायब झाल्यानंतर दोन दिवसांनी राहुल याने नवी दिल्लीतील एटीएम सेंटरमधून पैसे काढलेले होते त्यानंतर रविवारी रात्री उशिरा एका नातेवाईकाशी संपर्क सादर आपला मित्रासोबत वाद झालेला आहे म्हणून आपण पुणे सोडलेले आहे असे देखील तो म्हणाला मात्र त्यानंतर त्याने तात्काळ फोन बंद केला. त्याच्या फोनचे लोकेशन कोलकत्ता इथे आढळून आलेले होते. वारजे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्ता बागवे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला या संदर्भात माहिती दिलेली आहे.
दर्शना दत्तू पवार ( वय 26 ) असे मयत तरुणीचे नाव असून मूळची ती अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची रहिवासी आहे . गेल्या काही वर्षांपासून ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती आणि पुण्यात क्लासला देखील ती काही दिवस राहायला होती त्यानंतर आपल्या गावी जाऊन तिने सेल्फ स्टडी केला आणि स्पर्धा परीक्षा क्रॅक करत फॉरेस्ट ऑफिसर म्हणून तिला नोकरी देखील लागलेली होती.
पुण्यातील एका खाजगी अकॅडमीच्या वतीने तिचा सत्कार समारंभ होता म्हणून नऊ तारखेला ती पुण्यात आलेली होती त्यानंतर ती नऱ्हे इथे तिच्या एका मैत्रिणीकडे राहायला होती. 12 जून रोजी तिने मैत्रिणीला आपण सिंहगड किल्ल्याकडे ट्रेकिंगसाठी जात आहोत असे तिने सांगितले आणि कुटुंबांना देखील फोन करून याबद्दल माहिती दिलेली होती. 12 जून रोजी ती बाहेर पडल्यानंतर तिचा फोन बंद झाला आणि तब्बल तीन दिवस तिचे कुटुंबीय तिचा शोध घेत होते. अखेर सिंहगड रोड पोलिसात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी तपास सुरू केला त्यावेळी तिच्यासोबत एक तरुण असल्याची माहिती समोर आली मात्र हा तरुण देखील बेपत्ता झालेला होता त्याला आता ताब्यात घेण्यात आले आहे .