‘ नवऱ्याला जादूटोणा करीन ‘ म्हणत घरी यायचा अन आतून कडी लावायचा

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून नाशिक येथील ही घटना आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर येथे एका भोंदू बाबाने आजारी महिलेला जादूटोणा आणि उतारा करून आजार बरा करून देण्याचे आमिष दाखवत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केल्याचे प्रकरण समोर आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , किशोर लोखंडे असे याप्रकरणी संशयित असलेल्या भोंदू बाबाचे नाव असून लासलगाव पोलिसांनी त्याच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीला पोलिसांनी अटकही केलेली आहे . गेल्या अनेक वर्षांपासून दिवसांपासून महिलेला तो आजार बरा करण्याच्या निमित्ताने तिच्यावर अत्याचार करत होता.

पीडित महिला 12 ते 13 वर्षांपासून आजारी होती. आजार बरा व्हावा यासाठी तिने रुग्णालयात उपचार घेतले मात्र फरक पडत नसल्याने अखेर ती संशयित असलेल्या भोंदू बाबाकडे गेलेली होती. किशोर लोखंडे याने तिला जादूटोणा करण्याचे आमिष दाखवले आणि त्यानंतर तिच्या घरी जाणेयेणे सुरू केले.

29 मे रोजी आरोपी आपल्या घरी आला आणि त्याने आपल्यावर अत्याचार केला असे महिलेचे म्हणणे असून आरोपीने या घटनेचे फोटो काढत हे सोशल मीडियात व्हायरल करण्याची तसेच नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देत वारंवार असा प्रकार सुरू केलेला होता. कुणाला काही सांगितले तर नवऱ्याला जादूटोणा करून मारून टाकीन अशी देखील तो धमकी द्यायचा असे महिलेचे म्हणणे असून पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.


Spread the love