पुण्यात आता चक्क पोलीस उपनिरीक्षक यांना परप्रांतीयांकडून धक्काबुक्की

Spread the love

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पोलिसांवर हात उचलण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून पुन्हा एकदा अशीच एक घटना पिंपरीत समोर आलेली आहे. चायनीजच्या गाडीवरील भांडण सोडवत असताना पोलीस उपनिरीक्षक व्यक्तीला तीन जणांनी धक्काबुक्की केलेली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तीनही जणांना अटक करण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक तळेगाव स्टेशन येथे स्मिता चायनीजजवळ 17 तारखेला रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, दिनेश कसरत प्रधान ( वय 24 ), सरोज जगन्नाथ माझी ( वय 23 ), राजू विश्वम्भर प्रधान ( वय 22 तिघेही राहणार तळेगाव दाभाडे मूळ राहणार झारखंड ) अशी आरोपींची नावे असून पोलीस उपनिरीक्षक यांनी त्यांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे.

पोलीस उपनिरीक्षक छत्रपती शिवाजी चौकातील स्मिता चायनीज गाडीजवळ उभे असताना तिथे काही लोक भांडण करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यावेळी त्यांनी भांडण थांबवण्याच्या उद्देशाने प्रयत्न केला मात्र आरोपींनी उपनिरीक्षक यांना चक्क धक्काबुक्की केली त्यामध्ये त्यांच्या शर्टचे आणि बाहीचे बटन तुटले . पोलीस ठाण्यातून अधिक कुमक मागविण्यात आली आणि तीनही जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.


Spread the love