महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना अंबरनाथ येथे समोर आलेली होती. एका वयोवृद्ध व्यक्तीची हत्या करण्यात आली मात्र पोलिसांना या प्रकरणी कुठलेच धागेदोरे मिळून येत नव्हते . सखोल तपास सुरू करण्यात आला आणि या प्रकरणातील मुख्य आरोपीपर्यंत जाण्यात पोलिसांना यश आलेले आहे. सदर वृद्ध व्यक्तीची हत्या ही त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या एका तरुणाने केल्याचे समोर आलेले असून या वृद्ध व्यक्तीने तरुणासोबत समलैंगिक संबंधाची मागणी केली आणि त्याने नकार देण्यात दिल्यानंतर त्याच्यासोबत जबरदस्तीचा प्रयत्न केला त्यावेळी या तरुणाने त्याची हत्या केलेली आहे.
अंबरनाथच्या चिखलोली पाड्यात ही घटना समोर आलेली असून शिवाजीनगर पोलिसांनी संदीप जयस्वाल नावाच्या 19 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलेले आहे . कृष्णानंद मुनियान असे मयत व्यक्तीचे नाव असून कृष्णानंद हा आपल्याला शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती करत होता. दारू पिण्याच्या बहाण्याने त्याने आपल्याला मुक्कामाला बोलावले आणि त्यानंतर रात्रीच्या सुमारास तो आपल्यासोबत लगट करू लागला म्हणून आपण हा प्रकार केला असे या तरुणाने म्हटलेले आहे. 27 जूनपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
रविवारी रात्री कृष्णानंद याने आरोपी संदीप याला दारू पिण्याच्या बहाण्याने स्वतःच्या घरी बोलावलेले होते. संदीप घरी आल्यानंतर दोघांनी यथेच्छ दारू पिली आणि त्यानंतर संदीप देखील तिथेच मुक्कामाला थांबला. रात्रीच्या सुमारास कृष्णानंद यांच्या मनात शारीरिक संबंधाची इच्छा झाली आणि त्याने संदीप यांच्यासोबत समलैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला मात्र संदीप याने वाद झाल्यावर त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली . सत्तावीस जूनपर्यंत संदीप याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिलेली आहे.