एक अजब घटना उत्तर प्रदेशातून समोर आलेली असून एका मुस्लिम व्यक्तीने त्याच्या पत्नीला तलाक दिल्याचे प्रकरण समोर आलेले आहे. त्याची पत्नी असलेली शहनाज ही सातत्याने श्रीकृष्णाची भक्ती करायची हे पाहिल्यानंतर त्याचा संताप अनावर झाला आणि त्यानंतर त्याने तिला ट्रिपल तलाक देऊन स्वतःपासून वेगळे केले . शेहनाज ही आई-वडिलांच्या घरी आली मात्र आई-वडील आणि इतरही माहेरच्या लोकांनी तिला खडे बोल सुनावले त्यामुळे अखेर तिने लहानपणीचा मित्र असलेला पवन याला आपल्या दुःखाची कल्पना दिली.
दरम्यानच्या काळात पवन आणि शहनाज यांच्यात मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. पवन याने तुझे लग्न झाले असेल तरीदेखील मी तुझ्यासोबत लग्नाला तयार आहे असे म्हणत तिला आधार दिला आणि त्यांनी आश्रमात जाऊन लग्न केले. शेहनाज हिने आई-वडिलांचे घर सोडले आणि त्यानंतर पवन सोबत हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केलेले आहे. लग्नानंतर तिने तिचे नाव आरोही असे ठेवलेले आहे.
सदर घटना ही फरीदपूर परिसरातील ढाकणी गावातील असून आरोही आणि पवन यांचा संसार सध्या सुखाने सुरू आहे. पवन आणि शहनाज हे लहान लहानपणापासून एकमेकांचे मित्र आहेत. शेहनाज हिला लहानपणापासून श्रीकृष्णाच्या भक्तीचा छंद जडलेला होता अन सातत्याने ती श्रीकृष्णाची पूजा करायची त्यामुळे तिच्या घरात देखील वाद होत होते.
2018 मध्ये तिचे लग्न झाले आणि लग्नानंतर दोन महिन्यांनी श्रीकृष्णाची सतत पूजा करत असल्याकारणाने घरात तिच्या सासरच्या घरातही वाद सुरू झाले . अनेकदा तिला सासरच्या व्यक्तींकडून सांगण्यात आले मात्र तिने श्रीकृष्णाची भक्ती सुरूच ठेवलेली होती त्यानंतर पतीने तिला ट्रिपल तलाक देऊन घरातून काढून दिले तर आई-वडिलांनी देखील तिचे काहीही ऐकून घेतले नाही मात्र अखेर तिने धर्मांतर करत पवनसोबत लग्न केलेले आहे.