काहीही करा ‘ ती ‘ भावच देईना म्हणून मध्यरात्री तिच्या घरी तरुण घुसला अन ..

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना नागपूर इथे उघडकीस आली आहे. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्या मुलीवर आपले प्रेम आहे ती प्रतिसाद देत नसल्याचे पाहून एका विकृताने चक्क तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे तिने विरोध केला असताना त्याने तिच्या गळ्यात स्कार्फ बांधून तिला मारण्याचा देखील प्रयत्न केला. आदेश तिरपुडे (वय 23) असे या तरुणाचे नाव असून तो फरार झाला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, आदेश तिरपुडे (वय 23) याचे शेजारच्या मुलीसोबत प्रेम होते मात्र तो काहीच कामधंदा करत नव्हता तसेच तो एका वाहन चोरीच्या गुन्ह्यात देखील अडकला त्यामुळं तरुणी त्याला टाळू लागली होती. तरुणीचे आईवडील हातमजुरी करत असून ती देखील नर्सिंगचा अभ्यास करत आहे. आपल्याला लग्नासाठी मागणी घालणारा तरुण काहीच काम धंदा करत नसल्याने तिने त्याचा नाद सोडून दिला आणि आपल्या रुग्णसेवेवर भर दिला. काही अर्थाजन करून ती आपल्या कुटुंबाला देखील त्यातून हातभार लावते..

आदेश तिला भेटण्याचा प्रयत्न करत होता मात्र ती भाव देत नसल्याने तो संतापला आणि कन्हान येथे शुक्रवारी मंडईचा कार्यक्रम असल्याने त्याला तिला भेटण्याची संधी मिळाली. मंडईनिमित्त मुलीचे आई-वडील आणि भाऊ कन्हानला गेले असताना तरुणी रात्री एकटीच घरी असल्याने तो तरुणीच्या घरात घुसला आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला मात्र ती भाव देत नसल्याने तो संतापला आणि त्याने चक्क तिच्या गळ्याला स्कार्फ गुंडाळून तिला मारण्याचा प्रयत्न केला.

मुलीने आरडाओरडा सुरु करताच शेजारी राहणारा तिचा चुलतभाऊ धावून आला आणि त्याने तिची त्याच्या तावडीतून सुटका केली. आता आणखी लोक जमले तर आपली चांगलीच धुलाई होणार हे लक्षात येताच आदेशनं तिथून पळ काढला. कोराडी पोलीस आता आदेशचा शोध घेत असून लवकरच त्याला पकडण्यात येईल असे सांगण्यात आले आहे .


Spread the love